नंदगडमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन युवक थोडक्यात बचावले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुलेरो आणि दुचाकीमध्ये झालेल्या या धडकेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.


नंदगड जवळील मुख्य रस्त्यावर बुलेरो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून सुदैवाने दोन्ही युवकांचे प्राण वाचले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी खानापूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.



Recent Comments