Belagavi

बेळगावच्या स्टेडियमसाठी १५ ते २० कोटींच्या निधीची गरज

Share

बेळगावमध्ये गेल्या दहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम अस्तित्वात असून, या मैदानाचा पूर्ण क्षमतेने विकास करण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य आशिष शेलार यांची भेट घेऊन मैदानाच्या प्रलंबित कामांसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

या मैदानावर आतापर्यंत रणजी ट्रॉफी, भारत ‘अ’ संघ विरुद्ध परदेशी संघ आणि दुलीप ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठेच्या क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. मात्र, स्टेडियमच्या विकासाची काही कामे अजूनही प्रलंबित आहेत. हे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे १५ ते २० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे अभय पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास हे स्टेडियम टी-२० आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या आयोजनासाठी सज्ज होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मैदानाचा पूर्ण विकास झाल्यास बेळगाव परिसरातील क्रिकेटला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक पातळीवर आर्थिक व व्यावसायिक उलाढालही वाढेल. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य निर्देश देऊन मार्गदर्शन करावे, जेणेकरून स्टेडियमच्या क्षमतेचा पूर्ण वापर करता येईल, अशी विनंती अभय पाटील यांनी केली आहे.

Tags: