Belagavi

राजापूर गावात किरकोळ कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या

Share

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील राजापूर गावात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने केवळ संशयापोटी एका तरुणाची मंदिरासमोर लोखंडी सळईने डोक्यात प्रहार करून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली आहे.

मंजुनाथ सुभाष एन्णी (२३) असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मृत मंजुनाथ आपल्या बहिणीशी बोलत असल्याचा संशय आरोपी अल्पवयीन मुलाला होता. याच रागातून आरोपीने मंजुनाथचा काटा काढण्याचे ठरवले होते. १९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ६ च्या सुमारास मंजुनाथ गावातील विठोबा मंदिरात पूजेसाठी गेला असताना तिथे दबा धरून बसलेल्या आरोपीने लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर जोरदार वार केले, ज्यात मंजुनाथचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मृताचे चुलते सुरेश अशोक एन्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून घटप्रभा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटप्रभा पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी व्यक्त केली.

Tags: