हिंदू समाज संघटित करून धर्मजागृतीचे कार्य निरंतरपणे सुरू ठेवावे, असे आवाहन दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केले.


बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील मळेकरणी मंदिर परिसरात धनंजय जाधव मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता मेळावा आणि स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, महापौर मंगेश पवार, श्रीराम सेना प्रमुख रविकुमार कोकीतकर, माजी आमदार मनोहर कडोल्कर, उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह संजय कुबळ, पंडित ओगले, एफ्. एस्. सिद्धनगौडर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्य वक्ते अनिल महाराज देवळेकर यांनी हिंदुत्वावर मार्गदर्शन करताना औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार आणि महाराजांची अढळ धर्मनिष्ठा यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांचे भाषण ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

कार्यक्रमाचे आयोजक धनंजय जाधव यांनी हिंदूंमधील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीचा दाखला देत, अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून आताच संघटित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोमल गावडे यांनी सूत्रसंचालन केले तर मानसी गोखले यांनी स्वागतगीत सादर केले. धनंजय जाधव आणि सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे सलग २९ व्या वर्षी हा मेळावा यशस्वी ठरला.


Recent Comments