Belagavi

गौरी महिला मंडळाच्या वतीने संक्रांतीनिमित्त ‘अन्नोत्सवा’चे आयोजन

Share

महिलांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावातील सदाशिवनगर येथील गौरी महिला मंडळाच्या वतीने संक्रांतीनिमित्त ‘अन्नोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘इन न्यूज’चे संपादक राजशेखर पाटील, मंडळाच्या अध्यक्षा महादेवी हागरगी, उपाध्यक्ष शशिकला जगजंपी आणि सचिव सुजाता गोकाक यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असलेले हे मंडळ १६ व्या वर्षात पदार्पण करत असून, वर्षभर शिक्षक दिन, प्रतिभा पुरस्कार असे विविध उपक्रम राबवते. सदाशिव मंदिर परिसरात पार पडलेल्या या उत्सवात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.

या अन्नोत्सवात खाद्यपदार्थ, कपडे, गृहोपयोगी वस्तू, दागिने आणि सेंद्रिय उत्पादने अशा विविध प्रकारच्या ४० हून अधिक स्टॉल्सनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे शशिकला नाडगौडा यांनी सांगितले.

याप्रप्रसंगी सहसचिव सविता पाटील, खजिनदार प्रेमा एत्तीनमनी, सरोजा रमेश, लता शेट्टी, स्नेहल कालभैरव, शशी राचनायकर, अरुणा कडुलकर, शीला गडकरी, धनश्री कुलकर्णी, पृथा पाटील, विनोदा होंगल, संध्या मिरजकर, शीला पाटील, शारदा गणाचारी यांच्यासह मंडळाच्या इतर सदस्या उपस्थित होत्या.

Tags: