बांगलादेशात हिंदू समुदायावर होत असलेल्या निरंतर अत्याचारांच्या विरोधात ‘हमारा देश संघटने’ने तीव्र संताप व्यक्त केला असून, राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

बांगलादेशातील हिंदू नागरिक दीपु चंद्र दास यांची झालेली निर्घृण हत्या हा हिंदूंच्या विरोधात सुरू असलेल्या धार्मिक द्वेषाचा आणि संघटित हिंसाचाराचा एक भाग असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
बांगलादेशातील हिंदू गेल्या अनेक दशकांपासून हत्या, बलात्कार, अपहरण, धर्मांतर आणि मंदिरांच्या विटंबनेला बळी पडत आहेत. बांगलादेश सरकार आपल्या हिंदू नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्यामुळे तिथे भीतीचे आणि अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असून हिंदूंचे अस्तित्व पुसून टाकण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. या अमानवीय घटना रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने जागतिक स्तरावर राजनैतिक दबाव निर्माण करावा, अशी मागणी हमारा देश संघटनेच्या सदस्यांनी यावेळी केली.


Recent Comments