भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी आमच्या पक्षाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील अंतर्गत कलह आणि यत्नाळ यांच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी बोचरी टीका मंत्री मधू बंगारप्पा यांनी केली आहे.

बेळगाव येथील सुवर्णसौध येथे माध्यमांशी बोलताना मंत्री मधू बंगारप्पा यांनी भाजपवर निशाणा साधला. विजयेंद्र हे स्वतःच आपल्या अध्यक्षपदावरून ‘आउटगोइंग’ असावेत, असा टोला त्यांनी लगावला. विजयेंद्र यांनी त्यांच्या पक्षाची काळजी घ्यावी, आमच्या पक्षाबद्दल त्यांनी विचार करण्याची अजिबात गरज नाही. यत्नाळ पक्षाबाहेर का पडले, यावर विजयेंद्र काही बोलणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना त्यांना विनाकारण पदावरून का हटवण्यात आले, याचे कारण त्यांनी स्पष्ट करावे. त्यांना पदावरून हटवण्यामागे भ्रष्टाचार हेच कारण असावे, असा दावा करत विजयेंद्र यांनी आधी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे त्यांनी म्हटले.
यावेळी गृहलक्ष्मी योजनेच्या निधीवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यासंदर्भात आपली बाजू आधीच मांडली आहे. या विषयावर जे स्पष्टीकरण देणे आवश्यक होते, ते त्यांनी दिले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
विजयेन्द्र यांनी आधी स्वतःच्या पक्षातील गटबाजीकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले.


Recent Comments