बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी सभागृहात येण्याऐवजी बाहेर निदर्शने केल्याबद्दल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

१० वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होणे अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षाचा एकही सदस्य उपस्थित नसल्याने त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. नारायणस्वामी म्हणाले की, “हे सरकार राज्यात जिवंत आहे की हरवले आहे? जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्याची जबाबदारी विसरून सरकार बाहेर वेळ घालवत आहे.” सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त करत सरकारच्या या भूमिकेचा निषेध केला.

उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी आणि या भागातील जनतेच्या हितासाठी आयोजित केलेल्या अधिवेशनाशी काँग्रेस सरकार द्रोह करत असल्याची टीका त्यांनी केली. “तुम्ही बेळगावला फक्त कुंदा खायला आलात का?” असा टोला लगावत त्यांनी विचारले की, उत्तर कर्नाटकला सरकार अशा प्रकारे मान देत आहे का? जनतेच्या समस्या बाजूला सारून केवळ राजकारण करणाऱ्या सरकारचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.


Recent Comments