विरोधी पक्षनेते चलुवादी नारायणस्वामी यांनी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार संविधान आणि उत्तर कर्नाटकातील समस्यांच्या विरोधात असून, त्यांना उत्तर कर्नाटकाचा विकास करण्याची इच्छा नसल्याचा घणाघात त्यांनी केला.

बेळगाव मधील सुवर्ण सौधमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारला उत्तर कर्नाटकाचा विकास करण्याची तळमळ असावी लागते. विरोधी पक्ष देत असलेले सल्ले आणि सूचना स्वीकारण्याचा मोठेपणा सरकारमध्ये असावा लागतो. या सरकारने तो मोठेपणा गमावला असेल, तर आम्ही काय करणार? हे सरकार संविधानविरोधी, उत्तर कर्नाटकातील समस्यांविरोधी आहे, एकूणच, त्यांना उत्तर कर्नाटक वाढू द्यायचा नाही, हे यातून स्पष्ट होते. आजपर्यंत सरकारने कशाबद्दलही तोंड उघडलेले नाही. दोन दिवसांत उत्तर देता येईल का? त्यामुळे अधिवेशन एक आठवड्याने वाढवावे, अशी मागणी मी सरकारकडे करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

गृहलक्ष्मी अनुदानाच्या पैशाबद्दल बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. गृहलक्ष्मीचे ५ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सरकार सांगते, पण अनेक लोकांना अजूनही दोन हप्ते वगळता पैसे मिळालेले नाहीत. ते सर्व पैसे कुठे गेले? ते कोणत्या लक्ष्मीच्या घरी गेले? हे सरकारने सांगितले पाहिजे. सरकारला याबद्दल काहीच काळजी नाही. मी विरोधी पक्षनेता आहे, मी बोलत आहे, पण या सरकारकडून माझ्या बोलण्याला काही किंमत दिली जात आहे का? अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “गृहलक्ष्मी योजनेचे ५००० कोटी रुपये कोणत्या लक्ष्मीच्या घरी गेले, याचा सरकारने खुलासा करावा,” अशी मागणीही चलुवादी नारायणस्वामी यांनी केली.


Recent Comments