Belagavi

सरकार सत्तेत येताच पहिल्या दिवसापासून गॅरंटी योजना लागू: एच. एम. रेवण्णा

Share

गृहलक्ष्मी योजनेसह अन्य गॅरंटी योजनांच्या निधी वितरणात होत असलेल्या विलंबाबद्दल गॅरंटी अंमलबजावणी समितीचे राज्याध्यक्ष एच. एम. रेवण्णा यांनी बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

सरकार सत्तेत आल्याच्या पहिल्याच दिवसापासून पाचही गॅरंटी योजना लागू करण्यात आल्या असून, त्या आजवर यशस्वीरित्या दिल्या जात आहेत. काही लाभार्थ्यांना दोन-तीन महिन्यांतून एकदा पैसे मिळत आहेत. काहींना तांत्रिक कारणांमुळे अडचण आली आहे. विशेषतः, जीएसटी आणि आयकर भरणारे यामुळे समस्या निर्माण झाली होती. तात्पुरती खरेदी केली असताना जीएसटीची समस्या निर्माण झाली होती. ती समस्या आता दूर करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंतचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशात इतर योजनांची घोषणा झाली असली तरी त्या अजूनही लागू झालेल्या नाहीत. परंतु, आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण केले असून, खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचवत आहोत, असे समर्थन रेवण्णा यांनी केले.

आयकर आणि जीएसटी भरणार्‍यांशी संबंधित प्रलंबित असलेल्या १ लाख २० हजार प्रकरणांपैकी ५९ हजार प्रकरणे आतापर्यंत निकाली काढण्यात आली आहेत. तांत्रिक कारणांमुळे काहीवेळा निधी प्राप्त झाला नव्हता, परंतु तो निधी निश्चितपणे दिला जाईल. संपूर्ण व्यवस्थेलाच निधी दिला गेला नाही, असे म्हणता येणार नाही, आम्ही निधी देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गॅरंटी योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत काहींनी मत व्यक्त केले हे खरे आहे. मात्र, गॅरंटी योजना थांबवण्याचा प्रश्नच नाही. त्या योजना पुढे चालू ठेवण्याचा सरकारचा निर्णय आहे, असा विश्वास रेवण्णा यांनी व्यक्त केला.

Tags: