स्वतःहून मतदारांची फसवणूक करणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी आधीच अंकुश लावण्याचे काम केले आहे. आम्ही केवळ देश उभारणीचे कार्य करत आहोत आणि खोटेपणा पसरवणाऱ्यांना उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नाही असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले.

ते बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे माध्यमांशी बोलत होते. आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून राष्ट्रभक्तीचे कार्य करत आहोत. देशात खोटेपणा पसरवणाऱ्यांना कोणतेही उत्तर नाही. आम्हाला देश उभारणीचे कार्य करायचे आहे. स्वतःहून मतदारांची फसवणूक करणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी अंकुश लावण्याचे काम आधीच केले आहे, असे त्यांनी म्हटले.


Recent Comments