“डिनर पार्टी आणि राजकीय चर्चेचा काहीही संबंध नाही. सभागृहात आमच्या आमदारांकडून समस्यांवर चर्चा सुरू आहे आणि सरकार त्यावर उत्तरेही देत आहे. डिनर असेल, तर ते रात्री ८ वाजल्यानंतरच असेल,” अशा शब्दांत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

आज बेळगाव येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. बेळगावमधील तिसऱ्या रेल्वे गेटपासून मच्छे पर्यंतचा रस्ता, बॉक्साईट रोड आणि कणबर्गी रोड विकसित करण्यात आले आहेत. फ्लायओव्हर बांधण्याचा विचार आहे, तसेच सिंचन योजना लागू केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. डी.के. शिवकुमार यांच्या ‘डिनर पार्टी’संदर्भात ते म्हणाले की, हे दररोज चालते. यात राजकीय चर्चेचा प्रश्नच येत नाही. पुढील अधिवेशनादरम्यान अशा बैठका आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, वाल्मिकी स्वामीजींच्या ‘दलित मुख्यमंत्री’ या विधानावर बोलताना, स्वामीजींनी आपले मत व्यक्त केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या, “सरकार केवळ डिनर पार्टीत गुंतले आहे आणि समस्यांवर लक्ष देत नाही,” या आरोपावर प्रतिक्रिया देताना, ते म्हणाले की, सर्व आमदार टप्प्याटप्प्याने समस्यांवर चर्चा करत आहेत आणि सरकार त्यावर उत्तरे देत आहे. “डिनर असेल तर ते रात्री ८ च्या नंतरच,” असे सांगून ते पुढे निघाले.


Recent Comments