बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी अधिक वेळ द्यावा. तसेच सीमा भागाच्या विकासासाठी विशेष निधी देण्यात यावा, अशी मागणी निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी केली आहे.

सुवर्णसौधच्या आवारात आमच्या प्रतिनिधींशी बोलताना निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की, बेळगाव सुवर्णसौधमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात सर्वाधिक काळ उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा झाली पाहिजे. या भागातील सर्व आमदारांनी पक्षभेद विसरून येथील विकासासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे. याशिवाय, राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्कोडी आणि गोकाक शहरांना जिल्हा म्हणून घोषित करावे. दक्षिण कर्नाटकाप्रमाणेच येथील विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या हमी योजनांमुळे मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी सीमा भागातील निपाणी मतदारसंघाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या.


Recent Comments