Belagavi

काँग्रेसचे आमदार जेलमध्ये जाणार, हीच सातवी गॅरंटी! : चलवादी नारायणस्वामी

Share

राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे आमदार तुरुंगात जातील, हीच काँग्रेसची सातवी गॅरंटी आहे. राज्याची तिजोरी रिकामी झाली असून, राज्याला दुसऱ्या राज्याकडे ‘मेंटेनन्स’साठी देण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी केली.

आज सुवर्णसौधच्या आवारात ते माध्यमांशी बोलत होते. केंद्र सरकारला चांगले नाव मिळू नये यासाठी काँग्रेस सरकारने पीएम जनऔषधी केंद्रे बंद केली आणि आम्हीच कमी दरात औषधे देऊ, असे सांगून जनतेची फसवणूक केली. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. आता अन्य मार्ग नसल्यामुळे ती केंद्रे सुरू ठेवली नाहीत, तर जनताच सरकारला फटकारेल, असे त्यांनी म्हटले.

गॅरंटी योजना जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच काँग्रेस आमदारांना त्याबद्दल विश्वास नव्हता. विकास खुंटल्यामुळे गॅरंटी योजना थांबवा, अशी मागणी त्यांनी केली होती. विधिमंडळ पक्ष बैठकीतही ही मागणी जोर धरत आहे. मतदारांना आमिष दाखवून निवडणूक लढवली गेली. “या आमदारांनी आणि सरकारने जेलमध्ये जाणे, ही सहावी गॅरंटी आहे,” असे त्यांनी म्हटले. धर्मस्थळ प्रकरणासाठी सरकारने जबाबदारी स्वीकारून राज्यातील जनतेची माफी मागावी. सध्या राज्याची तिजोरी रिकामी झाली असून, राज्याला दुसऱ्या राज्याकडे ‘मेंटेनन्स’साठी देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: