Belagavi

धर्मस्थळ प्रकरणाचे सूत्रधार मुख्यमंत्र्यांभोवती; विजयेद्रांचा खळबळजनक आरोप

Share

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विजयेद्र यांनी मंगळवारी धर्मस्थळ प्रकरणावरून सत्ताधारी काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप केले. या प्रकरणातील ‘बुऱुडे गँग’ नव्हे तर खरे सूत्रधार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भोवतीच आहेत, असा खळबळजनक दावा विजयेद्र यांनी केला.

बेळगाव येथील सुवर्णसौधसमोर माध्यमांशी बोलताना त्यांनी धर्मस्थळ प्रकरणात सरकारने लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ केल्याचे म्हटले. त्यांनी पुढे सांगितले की, कोणीतरी रस्त्यावर हिंडणाऱ्यांच्या बोलण्यावरून एसआयटीची स्थापना करण्यात आली. यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या षडयंत्रात ‘बुऱुडे गँग’चा समावेश असल्याचे अहवालातून समोर आले आहे. तथापि, या प्रकरणाचे खरे सूत्रधार वेगळेच आहेत. ते सूत्रधार देखील सरकार तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आजूबाजूलाच आहेत, अशी चर्चा जनतेमध्ये आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Tags: