भाजपच्या नेत्यांना अचानक शेतकऱ्यांवर प्रेम आले आहे. त्यांनी सरकारविरोधात आंदोलन करावे, कोणाचा विरोध आहे? असे म्हणत महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

सरकारविरोधात भाजपचे लोक आंदोलन करत असल्याबद्दल प्रतिक्रिया देताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, शेतकऱ्यांबद्दल भाजपला अचानक कळवळा आल्यासारखे दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी भाजपने काय केले, याची एक यादी त्यांनी जाहीर करावी. त्यांना लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे, तसेच दिल्लीत झालेल्या आंदोलनात थंडी-पावसात शेकडो शेतकरी मरण पावले. शेतकऱ्यांवर गाडी चालवणारे कोण होते? तेच लोक आता शेतकऱ्यांबद्दल बोलण्यासाठी येत आहेत. त्यांना लाज वाटायला हवी. काँग्रेस पक्ष असो वा मी स्वतः, आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमचे धर्मनिरपेक्ष सरकार आहे. बसवण्णा, कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी यांच्यासह अनेक महापुरुषांच्या जयंती आम्ही दरवर्षी साजरी करत आहोत. मग टिपू जयंतीवरूनच वाद का निर्माण केला जात आहे, हे समजत नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणे, हे आमचे धोरण आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शेवटी स्पष्ट केले.


Recent Comments