Belagavi

डी.के. शिवकुमार यांच्या हस्तक्षेपामुळेच आघाडी सरकार पडले: रमेश जारकीहोळी

Share

डी.के. शिवकुमार यांनी बेळगावच्या राजकारणात केलेल्या हस्तक्षेपामुळेच तत्कालीन आघाडी सरकारचा पाडाव झाला, असे गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसमध्ये कोणीही मुख्यमंत्री व्हावा, त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही. आम्ही राज्यात विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे त्यांच्या पक्षाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात असलेले काँग्रेस आणि भाजपचे आघाडी सरकार पडण्यास डी.के. शिवकुमार जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. डी.के. शिवकुमार यांनी बेळगावच्या राजकारणात हस्तक्षेप केल्यामुळेच आघाडी सरकार कोसळले. यामध्ये सिद्धरामय्या यांचा कोणताही सहभाग नव्हता. माजी पंतप्रधान देवेगौडा कोणत्या अर्थाने बोलले आहेत, हे मला माहीत नाही, असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. डी.के. शिवकुमार भाजपमध्ये आले तर मी त्यांचे स्वागत करणार नाही. पुढील अडीच वर्षे राज्यात काँग्रेसचे सरकार चालून जनतेचा रोष ओढवून घ्यावा, अशा शब्दांत आमदार रमेश जारकीहोळी यांनी आपला संताप व्यक्त केला.

Tags: