Belagavi

११ जणांच्या मृत्यूला काँग्रेसचे ‘जबाबदार’ सरकार; आर. अशोक

Share

आरसीबी चेंगराचेंगरीच्या संदर्भात चौकशी संस्थेने अहवाल दिला नाही तरी चालेल, कारण त्यात आरसीबीलाच लक्ष्य केले जात असेल आणि त्यात कोणतेही तथ्य नसेल. काँग्रेस सरकारच्या चुकीमुळे राज्यातील क्रिकेट सामने इतर राज्यांत स्थलांतरित झाले असून, आमच्या कर महसुलावर परिणाम झाला आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला आहे.

आज बेंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. आरसीबी चेंगराचेंगरीच्या संदर्भात चौकशी संस्थेने अहवाल दिला नाही तरी चालेल, कारण त्यात आरसीबीलाच लक्ष्य केले जाईल. त्यात कोणतेही तथ्य असणार नाही. घर बुडव्या काँग्रेस सरकारमुळे बेंगळुरूमध्ये होणारे सर्व क्रिकेट सामने इतर राज्यांमध्ये वर्ग होत आहेत. याचा प्रतिकूल परिणाम हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या कर महसुलावरही परिणाम झाला आहे. सरकारने स्वतःची चूक केली आहे. काँग्रेसचे हे ‘हत्यारे’ सरकार आहे. यांच्यामुळेच ११ लोकांचा मृत्यू झाला आहे, असे त्यांनी म्हटले.

Tags: