राणी चन्नम्मा मिनी प्राणिसंग्रहालयात २९ काळविटांच्या झालेल्या मृत्यूला सरकार आणि वन विभागाचे दुर्लक्ष जबाबदार आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केली.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्यानेच भाजपने बिहार निवडणुकीत विजय मिळवला. भाजपचा जनतेवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत असताना, काँग्रेस मात्र तो गमावत आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून भाजपवर वारंवार टीका केली जात आहे.
“जर आम्ही मतदारांना १० हजार रुपये दिल्याचा आरोप खरा असेल, तर राहुल गांधी यांनी कायदेशीर लढाईसाठी पुढे यावे,” अशा शब्दात खासदार शेट्टर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थेट आव्हान दिले. पुढे बोलताना त्यांनी राणी चन्नम्मा मिनी प्राणिसंग्रहालयातील २९ काळविटांच्या मृत्यूसाठी सरकार आणि वन विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप करत या प्रकरणासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा आग्रह त्यांनी धरला.
याशिवाय, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता अबाधित राखणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव येथे १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता ‘एकता यात्रे’चे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


Recent Comments