Belagavi

काकतीत अनाथ वृद्धावर पोलिसांकडून अंत्यसंस्कार

Share

बेळगाव तालुक्यातील काकती येथे अनाथ वृद्धाच्या मृत्यूनंतर पोलिस आणि समाजसेवकांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कार केले. वारसांचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही माहिती मिळाली नसल्याने त्यांनी एकत्रितपणे अंत्यविधी पार पाडले.

गत १३ नोव्हेंबर रोजी काकती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर थंडीमध्ये असहाय अवस्थेत पडलेल्या एका अनोळखी वृद्धाला समाजसेवक गजानन गव्हाणे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मृत वृद्धाच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी काकती पोलिसांनी प्रयत्न केले; मात्र त्यांचा ठावठिकाणा समजू शकला नाही.

अखेर पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, पोलीस कर्मचारी संतोष जंबगी, रवी बारिकर, समाजसेवक गजानन गव्हाणे तसेच डिव्हाईन हेल्पिंग हँड्स ग्रुपचे कार्यकर्ते अशोक पिंगट, आशिष गव्हाणे, दीपक पाटील आणि इम्रान बागवान यांनी पुढाकार घेत काकती स्मशानभूमीत वृद्धावर अंत्यसंस्कार केले.

Tags: