गोव्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसच्या संघटनात्मक तयारीबाबत पणजी येथे गोवा प्रदेश महिला काँग्रेसची कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीत खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी नवनियुक्त अध्यक्ष आणि समिती सदस्यांना डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. आगामी निवडणुकीची तयारी तसेच ‘गोय राखोन’ अभियान यशस्वी करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.


या बैठकीला गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप, एम. के. शेख, सुनील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments