Belagavi

बेळगावच्या पॅरा जलतरणपटूंची राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

Share

भोपाळ येथे झालेल्या २६ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ३० पदकांची कमाई केली.

१२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत क्लबच्या ११ खेळाडूंनी १६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण ३० पदके पटकावली. स्वातिक पाटील याला स्पर्धेतील सर्वोत्तम जलतरणपटूचा बहुमान मिळाला. या कामगिरीच्या जोरावर कर्नाटक संघाने उपविजेतेपदाची ट्रॉफी मिळवली. या खेळाडूंना उमेश काळघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि विनायक अंबेवाडकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे. स्पर्धेत २६ राज्यांतील ४०९ हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

Tags: