Belagavi

बेनकनहळ्ळीत पुनरुज्जीवित ९८८ व्या तलावाचे लोकार्पण

Share

बेनकनहळ्ळी येथे ‘आमचे गाव, आमचा तलाव’ उपक्रमांतर्गत पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या ९८८ व्या तलावाचे लोकार्पण करण्यात आले.

श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना बी.सी. ट्रस्ट, बेनकनहळ्ळी नगरपंचायत, ग्राम पंच कमिटी आणि तलाव विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तलावाला बागिण अर्पण करून नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

राजर्षी डॉ. डी. वीरेंद्र हेगडे आणि मातृश्री डॉ. हेमावती हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मस्थळ ग्रामीण विकास योजनेतून जलसंवर्धन व ग्रामीण विकासाची कामे केली जात आहेत. तलावांच्या पुनरुज्जीवनामुळे भूजल पातळीत वाढ होऊन शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला हरी गुरूजी महाराज, पंच कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर देसूरकर, युवराज कदंब, बाळू देसूरकर, मनोहर बेळगावकर, प्रादेशिक संचालिका दयाशिला, डॉ. जी. आर. सोनेर, सतीश नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

Tags: