बेळगावमध्ये आमदार अभय पाटील यांनी महापालिकेच्या १५ नगरसेवकांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना दिवाळी भेटवस्तू देण्यात आल्या.

दिवाळीच्या पाचव्या दिवशी आयोजित या कार्यक्रमात महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आमदार अभय पाटील यांचे औक्षण केले. त्यानंतर आमदार, नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र बसून फराळ केला.


शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेतात. त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यासोबतच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले. नागरिकांनीही स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या पाच वर्षांपासून काम करत असताना अशा प्रकारे सर्वांना एकत्र बोलावून सन्मानित करणे, भेटवस्तू देणे आणि त्यांच्यासोबत फराळ करणे, असा अनुभव पहिल्यांदाच आल्याची भावना स्वच्छता कर्मचारी सुरेश कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी आमदारांचे आभार मानले.



Recent Comments