Belagavi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा हवामान प्रकरणी दलित संघटना आक्रमक

Share

बेळगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील त्यांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर दलित संघटनांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचा अवमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उद्यान परिसरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सुरक्षेसाठी वॉचमनची नियुक्ती करावी आणि बंद पडलेले दिवे तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी दलित नेते मल्लेश चौगुले यांनी केली. यावेळी विविध दलित संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: