बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा आणि उद्यानांच्या विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. आमदार आसिफ सेठ आणि युवा नेते अमान सेठ यांनी सुमारे ८० लाख रुपये खर्चाच्या ‘प्रगती गार्डन’ नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करून शुभारंभ केला.

आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्यासमवेत सुमारे ८० लाख रुपये खर्चाच्या प्रगती गार्डन नूतनीकरण कामाचा प्रारंभ केला.
या योजनेअंतर्गत उद्यानातील सुविधा सुधारून नागरिकांना फेरफटका मारणे, विश्रांती आणि मनोरंजनासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या नूतनीकरणामुळे उद्यानाचे सौंदर्य वाढण्यासोबतच स्थानिक रहिवाशांना एक सुसज्ज सार्वजनिक ठिकाण उपलब्ध होणार आहे.

या प्रसंगी ज्योती भाविकट्टी, नगरसेवक दिनेश नाशीपुडी व राजशेखर धोणी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments