बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या पदयात्रेत युवा नेते मृणाल हेब्बाळकर सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पदयात्रेत चालत त्यांनी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी मागणी केली.

आपल्या आईच्या आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास मृणाल हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा असून, आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या अन्नदात्याच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मागील आंदोलनाप्रमाणेच या वेळीही शेतकऱ्यांच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या हिरेबागेवाडीत सुरू असलेल्या या पदयात्रेने सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.
Belagavi
हिरेबागेवाडीत शेतकऱ्यांची भव्य पदयात्रा


Recent Comments