बेळगावात उसाला योग्य आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पदयात्रेमुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आज तातडीने बेळगावात येत आहेत.
सुवर्ण विधानसौध परिसरातील कल्याण मंडपातून काल सुरू झालेली शेतकऱ्यांची भव्य पदयात्रा कित्तूर तालुक्यातील एम. के. हुब्बळ्ळी येथे पोहोचली आहे.

ही पदयात्रा कित्तूरमध्ये पोहोचण्यापूर्वीच मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे शनिवारी दुपारी विशेष विमानाने बेळगावात दाखल होत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात कोणताही अधिकृत कार्यक्रम नसला तरी ते वाटेतच शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. बेळगावात शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते आज रात्रीच परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


Recent Comments