Belagavi

मराठा समाजाचे आराध्य दैवत श्री शंभो जत्ती मठात नवरात्रीनिमित्त ३डी देखाव्याचे उद्घाटन

Share

नवरात्रीनिमित्त यंदा श्री दत्तिमठात विविध प्रकारची आरास साकारण्यात आली आहे

उत्सव मूर्ती म्हणून नरसिंह भगवान ची मूर्ती समोर उभी करण्यात आली आहे दक्षिण भारतातील पहिली 3डी मूर्ती खास कोल्हापूरहून आणण्यात आली आहे आणि आकर्षक आणि भव्य मूर्ती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे.

त्यानंतर दुर्गादेवी मंदिरात सप्तशृंगी नाशिकची देवीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे सप्तशृंगी देवीची प्रतिकृती देखील हुबेहूब साकारण्यात आली आहे आणि श्री दुर्गामाता मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा चे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते

माजी आमदार अनिल बेनके यांनी या नरसिंह मूर्तीचे देखाव्याचे उद्घाटन केले
दत्ता जाधव यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्तानचे रमाकांत कोंडुस्कर आदि यावेळी उपस्थित होते.

Tags: