Belagavi

एसआयआर फॉर्म ७ वाद: काँग्रेस सरकारला हायकोर्टाचा झटका, अनिल बेनके आक्रमक

Share

भाजप कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी दिली.

एसआयआर फॉर्म ७ प्रकरणात काँग्रेस सरकारने राजकीय सूडबुद्धीने भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले होते, असा आरोप त्यांनी केला. या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने काँग्रेस सरकारला दणका देत एफआयआरला स्थगिती दिली आहे. तसेच शाश्वत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार पीडीओंकडे देणे चुकीचे असून यामुळे त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे बूथ पातळीवरील अधिकारी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत, असा इशारा अनिल बेनके यांनी दिला. अवैध स्थलांतरितांना बाहेर हाकलून लावेपर्यंत भाजपचा लढा सुरूच राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस पी. राजीव, प्रदेश प्रवक्त्या सुरभी होदिगेरे, कांती शेट्टी आणि राघवेंद्र उपस्थित होते.

Tags: