रामतीर्थनगरच्या विकासात माझे मोठे योगदान असल्याचे बेळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी सांगितले. श्रीराम कार्यसिद्धी आंजनेय स्वामी मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे आयोजित दसरा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

नगरसेवक म्हणून केलेल्या विकासकामांची जनतेला पूर्ण जाणीव आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, विजेचे दिवे आणि गटारी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचे समाधान मनाशी आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या लोकोपयोगी उपक्रमांना नेहमीच सहकार्य केले असून, या परिसराच्या विकासात आपला मोठा वाटा असल्याचे उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी स्पष्ट केले.
रविवार दि. १२ रोजी बेळगाव येथील रामतीर्थनगरच्या श्रीराम कार्यसिद्धी आंजनेय स्वामी मंदिरात दसरा उत्सवानिमित्त दांडियाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी दांडिया खेळून महोत्सवाचा प्रारंभ केला.

विकासकामांच्या प्रवासात माजी मंत्री स्व. उमेश कत्ती, दक्षिणचे आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके आणि उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. एका सामान्य कार्यकर्त्याला ओळखून संधी देणाऱ्या रामतीर्थनगरच्या जनतेचे आभार मानत, त्यांनी दिलेल्या आशीर्वादाची सदैव आठवण राहील असे सांगत विरोधकांना कामातूनच उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान महापौर प्रीती कामकर आणि विनायक कामकर यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. महापौर प्रीती कामकर यांनीही दांडियाचे उद्घाटन करून या भागाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त बसप्पा उरबिनहट्टी होते. व्यासपीठावर माजी महापौर एन. बी. निर्वाणी, ईरय्या खोत, मंदिराचे अध्यक्ष सुरेश उरबिनहट्टी, निवृत्त अभियंता जी. एस. पाटील उपस्थित होते. तसेच सचिव मंजुनाथ पाटील, शिवानंद मठपती, बसवराज मराठे, संजू डोनवाडे, महिला संघाच्या पल्लवी पाटील, काव्या चिटगी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments