Belagavi

राणी कित्तूर चन्नम्मा चौकात महिलेला मारहाण

Share

बेळगावातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकात बसमधून उतरताना रस्ता देण्याच्या वादातून एका व्यक्तीने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

हलीयाळहून बेळगावकडे येणाऱ्या बसमधून कक्केरी येथून एक महिला आपल्या कुटुंबासह प्रवास करत होती. बेळगाव येथील चन्नम्मा चौक येथे बसमधून खाली उतरताना रस्ता देण्यावरून महिला आणि एका व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली.

सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रुपांतर नंतर मारहाणीत झाले. संतप्त झालेल्या व्यक्तीने महिलेला चपलेने आणि लाथांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

Tags: