Chikkodi

कारखाने विकून दाखवाच; चूनप्पा पूजेरींचे प्रभाकर कोरेंना थेट आव्हान

Share

कारखाना विकला तरी ५५०० रुपयांचा दर देणे शक्य नाही या प्रभाकर कोरे यांच्या विधानावर राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चूनप्पा पूजेरी यांनी तीव्र आक्षेप नोंदवत प्रत्युत्तर दिले आहे.

हमीभाव आणि शासकीय गणितानुसार शेतकर्‍यांना योग्य भाव मिळणे हा त्यांचा हक्क असून कारखाना विकण्याची भाषा करण्याची गरज नाही, असा थेट सवाल चूनप्पा पूजेरी यांनी उपस्थित केला.

कर्नाटक राज्य शेतकरी संघटना, शशिकांत पडसलगी आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांच्या हितासाठी आंदोलनाची बांधणी केली जात आहे.

देशभरात ५५० हून अधिक तर कर्नाटकात ८५ पेक्षा जास्त साखर कारखाने असून कारखानदारांनी शेतकरीविरोधी धोरण न स्वीकारता ऊस उत्पादकांच्या हिताचे रक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

२९ सप्टेंबर रोजी आयोजित शेतकरी मेळावा आणि आंदोलनात सर्व साखर कारखाना मालक व शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चूनप्पा पूजेरी यांनी केले.

साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून त्यांना योग्य दर दिला पाहिजे, असे कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चूनप्पा पूजेरी यांनी म्हटले.

Tags: