Chikkodi

चिकोडीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; एकाच दिवशी १३ जणांवर हल्ला

Share

चिकोडी शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून एकाच दिवशी विविध भागांत १३ जणांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले.

शहरातील इंदिरानगर, के. सी. रोड आणि बस स्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर त्या अचानक हल्ला करत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून हा त्रास वाढला असूनही पालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.या प्रकरणी नगरपालिकेने तातडीने मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा पालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Tags: