Belagavi

बेळगावमध्ये पोलिसांचे आणि आरएएफचे पथसंचलन

Share

गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगावमध्ये जलद कृती दलाने (आरएएफ) प्रमुख भागांत पथसंचलन केले.

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बेळगाव पोलीस प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरएएफ तुकडीने प्रमुख रस्त्यांवरून पथसंचलन केले. सीपीआय उस्मान अवटी यांच्या नेतृत्वाखाली निघालेले हे पथसंचलन शाहू नगर, आझम नगर, नेहरू नगर आणि सदाशिव नगर भागातून पार पडले.

नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे आणि असामाजिक तत्त्वांना इशारा देणे हा या पथसंचलनाचा मुख्य उद्देश होता. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Tags: