Chikkodi

चिक्कोडीत अभियांता दिन उत्साहात साजरा

Share

चिक्कोडीतील नागालिंगेश्वर कॉलनी येथील ‘सिव्हिल इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट्स असोसिएशन’च्या कार्यालयात भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांची १६६ वी जयंती व अभियांता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलताना चिक्कोडीचे आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की, स्थानिक अभियंत्यांच्या मागणीनुसार असोसिएशनच्या इमारत उभारणीसाठी ५,००० चौरस फूट जागा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल.

विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आपण स्वतः चिक्कोडीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी न्यायालय, तलाव सुशोभीकरण, सर्किट हाऊस आणि माता-बाल रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले.

येत्या काळात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून चिक्कोडीच्या विकासासाठी २० कोटी रुपयांचा विशेष निधी आणला जाईल, असे आश्वासन आमदार गणेश हुक्केरी यांनी दिले.

याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष आर. व्ही. हिरेमठ, उपाध्यक्ष महेश नेर्ले, सचिव करणसिंग हवालदार, सहसचिव शशिकांत कांबळे, खजिनदार आसिफ पठाण, ईसा नायकवडी, विद्यासागर इट्टी, एम. जी. मुत्यापगोळ यांच्यासह स्थानिक अभियंते उपस्थित होते.

Tags: