चिक्कोडी येथील बी. के. कॉलेजजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

बसंवराज बरमु लंबूगोळ असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघाताच्या तीव्रतेमुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, बसंवराज यांच्यावर सध्या चिक्कोडी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी वाहतूक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चिक्कोडी वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments