चिक्कोडी तालुक्यातील शिरगाव येथे श्री बसवेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक कुस्ती मैदानात हजारो क्रीडाप्रेमींनी कुस्त्यांचा थरार अनुभवला.


या कुस्ती स्पर्धेत कर्नाटक आणि शेजारील महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या नामांकित मल्लांनी आपल्या कौशल्याचे आणि ताकदीचे प्रदर्शन घडवले. अंतिम आणि महत्त्वाच्या कुस्त्यांमध्ये विजय मिळवलेल्या मल्लांना रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


या वेळी बोलताना गौरवसिंह मुतालिक सरकार यांनी ग्रामीण भागातील कुस्ती खेळ जिवंत ठेवल्याबद्दल आणि स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजक व ग्रामस्थांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला आमदार गणेश हुक्केरी आणि माजी खासदार रमेश कत्ती यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी पैलवानांना प्रोत्साहन दिले. यात्रेनिमित्त पहाटेपासूनच श्री बसवेश्वर मंदिरात विशेष पूजा आणि धार्मिक विधी पार पडले. हजारो भाविकांनी श्री बसवेश्वरांचे दर्शन घेतले.


Recent Comments