कराटे क्रीडा प्रकारात बेळगावच्या चार गुणवंत खेळाडूंनी कठोर परिश्रमाच्या जोरावर ब्लॅक बेल्ट प्राप्त करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


बेळगाव येथील तहसीलदार गल्लीतील श्री सोमनाथ मंदिरात कराटे बेल्ट परीक्षा आणि ब्लॅक बेल्ट प्रदान सोहळा पार पडला. कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षांपासून कठोर सराव करणाऱ्या वर्धन चौगुले, समीक्षा गुंडकल, जान्हवी मास्मर्दी आणि सायली गुंडकल यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला. या खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बेळगावची मान उंचावली असल्याचे विनायक दंडकर यांनी म्हटले.



Recent Comments