Chikkodi

चिक्कोडीत श्रीकृष्ण भवनाचे उद्घाटन

Share

चिक्कोडी येथील बसवेश्वर नगरमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण भवनाचे उद्घाटन करण्यात आले. हणबर समाजाच्या मागणीनुसार २० लाख रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या या भवनाच्या दुसऱ्या मजल्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी दिले.

उद्घाटन सोहळ्यात बोलताना प्रकाश हुक्केरी यांनी हणबर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण व आमदार गणेश हुक्केरी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात आशीर्वाद देताना चिक्कोडी येथील चरमूर्ती मठाचे श्री संपादना स्वामीजी यांनी हणबर समाजातील नागरिक कष्टाळू आणि प्रामाणिक असून त्यांनी शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात प्रगती करावी, असे आवाहन केले. तसेच या भवनाच्या उभारणीसाठी हुक्केरी पिता-पुत्रांसह माजी आमदार महांतेश कवटगीमठ आणि जगदीश कवटगीमठ यांचे सहकार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी माजी नगरध्यक्षा रामा माने आणि युवा नेते अजय कवटगीमठ यांनी आपले विचार मांडले. उद्घाटनानिमित्त विशेष होम आणि नवग्रह पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला शेखर मुंडे, सिद्राम मुंडे, शीतल मुंडे, संतोष टवळे, रमेश चौडनवर, महादेव करणुरे, सुंदर मुंडे, दुंडप्पा बाडकर, हनुमंतप्पा मध्याळी यांच्यासह हणबर समाजाचे प्रमुख नेते, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Tags: