Belagavi

प्रकाश निकम यांनी स्वीकारला बेळगाव पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार

Share

बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदाच्या बदलीसंदर्भातील घडामोडींनंतर अखेर नूतन पोलीस आयुक्त म्हणून प्रकाश निकम यांनी पदभार स्वीकारला आहे. कार्यालयात आगमन होताच त्यांना पोलिसांच्या तुकडीकडून मानवंदना देण्यात आली.

पदभार स्वीकारल्यानंतर निरोप घेणारे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रकाश निकम यांच्याकडे अधिकृतपणे सूत्रे सुपूर्द केली. या वेळी नूतन आयुक्तांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.

माजी आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरात राबवलेल्या चांगल्या उपक्रमांची मालिका पुढे सुरू ठेवली जाईल, असे प्रकाश निकम यांनी सांगितले. शहरात गुन्हेगारी पूर्णपणे मोडून काढण्यावर भर दिला जाईल तसेच आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल, असे प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी माजी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: