Belagavi

बेळगावात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी प्रशासकीय पातळीवर पाहणी

Share

गावोगावी आणि शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सव महामंडळाच्या विनंतीनंतर बेळगाव शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांची महापौर, आयुक्त आणि हेस्कॉमतर्फे पाहणी करण्यात आली .

महापौर प्रीती कामकर यांच्यासह मनपा आयुक्त, हेस्कॉम अधिकारी आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बेळगावच्या कपीलश्वर कुंड परिसरात विशेष पूजा करून कामांना सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राणी चन्नमा चौक , समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, धर्मवीर संभाजी महाराज चौक , टिळक चौक , हेमु कलानी चौक आणि मुख्य बाजारपेठ या प्रमुख मिरवणूक मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

रस्त्यांमधील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, तसेच सुरू असलेल्या विविध कामांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. पालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून हा उत्सव यशस्वी करावा, असे महापौर प्रीती कामकर यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस, हेस्कॉम आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली आहे. रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरणारे अनधिकृत बॅनर्स हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया आयुक्त कार्तिक एम यांनी दिली.

स्त्यांमधील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, तसेच सुरू असलेल्या विविध कामांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. पालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून हा उत्सव यशस्वी करावा, असे महापौर प्रीती कामकर यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस, हेस्कॉम आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली आहे. रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरणारे अनधिकृत बॅनर्स हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त कार्तिक एम यांनी दिली.

या पाहणी दौऱ्यादरम्यान सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रेयस नाकाडी, राजू भातकंडे, नितीन जाधव, गिरीश धोंगडी, आनंद चव्हाण, रेश्मा कामकर, वैशाली भातकंडे यांच्यासह विविध नगरसेवक, विकास विभागाच्या उपआयुक्त लक्ष्मी सुळगेकर आणि विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: