Belagavi

राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी बेळगावच्या चार खेळाडूंची निवड

Share

बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय डायव्हिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले आहे.

बंगळुरू येथे पार पडलेल्या कर्नाटक राज्य उपज्येष्ठ आणि ज्येष्ठ स्पर्धेत बेळगावच्या युवराज मोहंगेकर, अर्णव चिवटे, तन्वी मुचंडी, श्रेया जोगमनावरा आणि ओवी जाधव यांनी ६ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक मिळवले. प्रशिक्षक विश्वास पवार आणि भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले युवराज, अर्णव, श्रेया आणि तन्वी हे ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान इंदूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करतील.

एकूण ८ पदकांसह जनरल चॅम्पियनशिप पटकावणाऱ्या या खेळाडूंचे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, नागरसवेक नितीन जाधव, जयंत जाधव आणि क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: