Belagavi

खानापूरच्या दिव्या देसाईचा राजभवनात राज्यपालांकडून सत्कार

Share

एसएसएलसी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या खानापूर तालुक्यातील जुंजवाड येथील गुणवंत विद्यार्थिनी दिव्या प्रदीप देसाई हिचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.

बंगळुरू येथील राजभवनात पार पडलेल्या विशेष समारंभात हा सत्कार करण्यात आला. खानापूर तालुक्यातील झुंजवाड येथील सुकन्या आणि बिडी येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या प्रदीप देसाई हिने एसएसएलसी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. तिच्या या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत बंगळुरू येथील राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमात कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिव्या हिचा सत्कार केला.

या प्रसंगी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सध्या बेळगाव येथील गुरुदेव जांबगी सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्या देसाई हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: