बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेले हिडकल धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सकाळी धरणाच्या क्रस्ट गेटवरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे कोणत्याही क्षणी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिडकल धरण प्रशासन आणि सुरक्षा दलाने क्रस्ट गेट उघडून घटप्रभा नदीत पाणी सोडण्याची पूर्ण तयारी केली आहे. सकाळी धरणाच्या गेटांवरून पाणी वाहतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदीपात्रात पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घटप्रभा नदीकाठच्या गावकऱ्यांनी आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे व दक्षता बाळगावी, असा कडक इशारा तालुका प्रशासन आणि धरण व्यवस्थापनाने दिला आहे.


Recent Comments