Belagavi

ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा

Share

बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशन (बामा) तर्फे शहरातील फोर्ट रोड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मुख्य अतिथी ओमप्रकाश वैष्णव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर आयोजित डिलर्सच्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या समस्या आणि भविष्यातील व्यवसायाबाबत सविस्तर चर्चा झाली.

वाहतूक सुधारणा व व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना प्रतिसाद दिल्याबद्दल अध्यक्ष शरद पाटील यांनी उत्तरचे आमदार आसिफ शेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आभार मानले.

या प्रसंगी सचिव कमरउद्दीन सौदागर, माजी अध्यक्ष फिरोज खान, मंजीतसिंग कोहली, सुहास पाटील, श्याम धामुणे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

Tags: