Belagavi

भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकाचे बेळगावमध्ये जंगी स्वागत

Share

भारतीय सैन्यात दीर्घ २३ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील सैनिक महावीर कोटे यांचे बेळगाव रेल्वे स्थानकावर माजी सैनिकांच्या महासंघातर्फे जंगी स्वागत करण्यात आले.

रेल्वे स्थानकावर “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम”च्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर शहरातील कित्तूर चन्नम्मा चौकात राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे महासंघाच्या सैनिक संपर्क केंद्रात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

माजी सैनिकांच्या अशा स्वागत सोहळ्यांमुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळावी आणि अधिकाधिक तरुणांनी देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हावे, असे प्रतिपादन महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश पुजेरी यांनी केले.

या कार्यक्रमाला महासंघाचे संघटन सचिव मडीवाळप्पा कलभावी, महेश कम्मार, अशोक मजगी, रामचंद्र सुतार, महादेव हालगी, बसप्पा वन्नूर यांच्यासह पदाधिकारी आणि कोटे कुटुंबीय उपस्थित होते.

Tags: