Belagavi

नीलजी येथून पंढरपूरसाठी दिंडी रवाना: धनंजय जाधव यांच्या हस्ते प्रारंभ

Share

बेळगाव तालुक्यातील नीलजी येथील श्री कृष्ण आणि पांडुरंग भक्तांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी रविवारी प्रस्थान केले.

भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पूजन करून दिंडीला अधिकृतपणे हिरवा कंदील दाखवला.

गेल्या २५ वर्षांपासून नीलजी गावात हा धार्मिक उपक्रम अविरतपणे सुरू असून, यंदाही गावातील सुमारे २०० भाविक ४ खासगी वाहनांतून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. याप्रसंगी बोलताना धनंजय जाधव यांनी गावातील धार्मिक परंपरा जपणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचे कौतुक केले. या प्रसंगी नीलजी गावातील प्रमुख मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: