मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि इतर मराठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.


महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या सीमाभागातील पदाधिकाऱ्यांनी मीरा रोड येथील कार्यालयात अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. गेल्या १०-१२ वर्षांपासून मराठी भाषेसाठी कार्यरत असलेल्या या संघटनेसोबत सीमाभागाच्या प्रश्नांवर एकत्र काम करण्याचे या वेळी ठरवण्यात आले.

सीमाभागातील मराठी अस्मितेच्या मुद्द्याला राज्यभरातून पाठिंबा मिळवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यावर बैठकीत भर देण्यात आला. संघटनांच्या माध्यमातून मराठी भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय या प्रसंगी घेण्यात आला.


Recent Comments