दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत पदके जिंकणाऱ्या कर्नाटकातील खेळाडूंचा बेळगाव येथे सत्कार करण्यात आला. भाजप बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवी बी. पाटील यांच्या हस्ते या सर्व विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.


या सोहळ्यात वरिष्ठ पुरुषांच्या बॉडीबिल्डिंग विभागात सुवर्णपदक विजेता प्रताप कळकुंद्रीकर, रौप्यपदक विजेते प्रशांत खन्नुकर व रिषभ वशिष्ठ आणि महिला ॲथलेटिक फिजिक विभागात कांस्यपदक विजेती केतकी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्नाटक आणि देशाची मान उंचावणाऱ्या या खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांनी आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या, असे डॉ. रवी बी. पाटील यांनी म्हटले.

या कार्यक्रमाला कर्नाटक बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष अजित सिद्दन्नवर, बेळगाव घटकाचे अध्यक्ष गंगाधर एम., सचिव हेमंत हावळ , खजिनदार सुनील पवार आणि बसवराज हळंगली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments